पुणे पदवीधर मतदार नोंदणी अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद! राजवर्धन शिंदे यांच्या उपस्थितीत कै. बाबासाहेब गायकवाड संकुलात तरुणांचा सहभाग

 पुरंदर रिपोर्टर Live 

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी  

                   लोकशाहीला बळकटी देण्यासाठी तरुणाई पुढे येत असून, पदवीधर मतदार नोंदणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आयोजित “पुणे पदवीधर मतदार नोंदणी अभियान” कार्यक्रमाला तरुणांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला.

                      या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजवर्धन शिंदे (अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस बारामती) होते. त्यांनी तरुणांना उद्देशून म्हटले, “मतदार म्हणून आपली जबाबदारी पार पाडणे म्हणजे समाजपरिवर्तनाची सुरुवात आहे.



उपक्रमाचे आयोजन स्वप्निल बाबासाहेब गायकवाड यांनी केले होते.त्यांच्या पुढाकाराने तब्बल २०० पदवीधरांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून नाव नोंदणी केली.

                     स्वप्निल गायकवाड यांनी सांगितले की, “आगामी काळात आणखी शेकडो विद्यार्थी पदवीधर मतदार म्हणून नोंदवले जातील. हा अभियान केवळ नोंदणीचा नव्हे, तर जागृतीचा महोत्सव आहे.”यावेळीसोमेश्वर चे चेअरमन पुरुषोत्तम जगताप, व्हॉइस चेअरमन मिलिंद कांबळे, रमाकांत गायकवाड, ऋषिकेश गायकवाड, वैभव गायकवाड, जितू सकुंडे,प्रवीण सूर्यवंशी, विराज मदने,गणेश सावंत, सागर गायकवाड, हरीश गायकवाड, धीरज गायकवाड इत्यादी उपस्थित होते.   


      संपूर्ण संकुलात तरुणांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. “मतदार नोंदणी ही केवळ प्रक्रिया नसून लोकशाहीतील सहभागाचा सण आहे,”  अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Post a Comment

0 Comments